
संगमनेर (अहमदनगर) : दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी उभ्या केलेल्या सहकारी संस्था राज्यात आदर्शवत काम करीत आहेत. राज्यातील बहुतांश शेतकी संघ मोडकळीस आले असताना, संगमनेरचा शेतकी संघ दिमाखाने उभा असून सर्वोत्कृष्ट असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
राशीनच्या सरपंचावरील कारवाई लालफितीच्या कारभारात अडकली
शेतकी सहकारी संघाच्या 61 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजीराव थोरात होते. थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तत्त्वांवर येथील सहकारी संस्थेची वाटचाल सुरू आहे. काटकसर हे शेतकी संघाचे वैशिष्ट्य आहे. गुणवत्तेमुळे संघाच्या पेट्रोल पंपावर सर्वाधिक पेट्रोल विक्री होत आहे. आगामी काळातही या संस्था चांगल्या पद्धतीने जपताना शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिवाजी थोरात यांनी प्रास्ताविक केले. नोटीस वाचन व्यवस्थापक अनिल थोरात यांनी तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. संपतराव डोंगरे यांनी आभार मानले. आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.