जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 February 2021

जिल्ह्यात साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालवण्याची पध्दत आहे. ही शिस्त आमच्याकडे असलेली शिस्त आम्हाला कायम टिकवायची आहे.

संगमनेर (अहमदनगर) : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जागांकरिता झालेल्या निवडणुकीत, तीन जागा आल्या मात्र दुर्दैवाने एका जागेचा अपेक्षित निकाल आला नाही. मात्र बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. जिल्हा सहकारी बँकेच्या निकालानंतर रविवार (ता. 21) रोजी त्यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी  येथे क्लिक करा 

ते म्हणाले, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक राज्यातील अग्रगण्य बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून साखर कारखान्यांना कर्जाच्या रुपाने मदत होत असते. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्याचा अभिनव उपक्रम या बँकेने केला आहे. शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरलेल्या या महत्वाच्या बँकेची निवडणूक राजकारण विरहित केली आहे.

खर्डा किल्ला परिसरात श्री छत्रपती महाराजांचा 'पुतळा' उभारणार : आमदार रोहित पवार

साखर कारखानदारी सर्वांकडे आहे, ती चांगल्या पद्धतीने चालली तर आर्थिक चलन चांगले फिरते. जिल्ह्यात साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालवण्याची पध्दत आहे. ही शिस्त आमच्याकडे असलेली शिस्त आम्हाला कायम टिकवायची आहे. त्यात राजकरणाचा गुंता आम्ही करीत नाही. आवश्यकतेप्रमाणे गरजूला कर्जवाटप करणे, कारखाना चांगला चालविणे व त्यातून शेतकऱ्यांना मदत करण्याचे जुने सूत्र असून, तेच आम्ही टिकवतो आहे असेही थोरात म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue Minister Balasaheb Thorat has said that we will decide the chairman and vice-chairman of the district bank together