
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता, कोल्हापूर, नंदुरबार, नागपूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, वाशीम, बुलडाणा आदींसह 13 जिल्ह्यात कॉंग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. विदर्भात 50 टक्के जागांवर यश मिळाले. मराठवाड्यातही मोठे यश मिळण्याची खात्री आहे.
संगमनेर (अहमदनगर) : राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल पाहता, जवळपास 80 टक्के जागा महाविकास आघाडीने जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य मानावे लागेल. याचा अर्थ, आमच्या वर्षभरातील कामावर लोक समाधानी आहेत, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
हे ही वाचा : जेसीबीतून गुगालाची उधळण; गणेगाव येथे 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल, 20 जणांना अटक
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता, कोल्हापूर, नंदुरबार, नागपूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, वाशीम, बुलडाणा आदींसह 13 जिल्ह्यात कॉंग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. विदर्भात 50 टक्के जागांवर यश मिळाले. मराठवाड्यातही मोठे यश मिळण्याची खात्री आहे.
हे ही वाचा : नगरमध्ये रोहित पवारांची बल्ले बल्ले; विखे, राम शिंदेंना धक्का
राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे चार ते साडेचार हजार ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसची सत्ता आली. राज्यात भाजपची पीछेहाट झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खानापूरची व माजी प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावाची जागा राखता आली नाही. भाजपची मंडळी खोटे बोलण्यात पटाईत आहे. हा विजय महाविकास आघाडीच्या कामावर जनता समाधानी असल्याचे प्रतीक आहे, असे थोरात म्हणाले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राजकारण न आणता, बॅंक चांगल्या पद्धतीने चालवणाऱ्या, शेतकरीहिताचे निर्णय घेणाऱ्या समविचारी लोकांना एकत्र घेऊन निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.