Ahmednagar News : विखेंना काष्टीच्या विकासाचे वावडे का; दलित वस्तीचा निधी अडविल्याचा आरोप - साजन पाचपुते

मी गावाची ओळख विकासात्मक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, हा विकास काही लोकांना पाहवत नाही.
sajan pachpute criticize sujay vikhe over kasthi village development work  funding politics ahmednagar
sajan pachpute criticize sujay vikhe over kasthi village development work funding politics ahmednagarSakal

श्रीगोंदे : काष्टी गावात विकासात्मक सुधारणा करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय, पण पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती बैठकीतून मिळणारा निधी अडवून विकास थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हा निधी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या इशाऱ्यावरून अडविला गेल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे, पण त्यासाठी त्यांना कुणाचा आदेश आला होता, याचा खुलासा व्हावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते व गावचे सरपंच साजन पाचपुते यांनी दिला.

माध्यमांशी बोलताना साजन पाचपुते म्हणाले, की गावाने मला लोकनियुक्त सरपंच केले. माझे वडील सदाशिवअण्णा पाचपुते यांनी गावाचा विकास साधण्याचा केलेला प्रयत्न लोकांनी जवळून पाहिला असल्याने, मला काम करण्याची संधी दिली.

मी गावाची ओळख विकासात्मक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, हा विकास काही लोकांना पाहवत नाही. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे (दलित वस्ती सुधार योजना) हा हक्काचा निधी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत मंजूर होतो.

मात्र, काष्टीचा हा निधी खासदार विखे यांच्या इशाऱ्यावरून अडविला गेला. त्यासाठी तालुक्यातील कुणाचा आदेश होता, हे सगळ्यांना व गावकऱ्यांना माहिती आहे, मात्र काष्टीकरांची मते हवे असतील तर त्यांनीच त्याचा खुलासा करावा. मात्र विखे यांना काष्टीकरांची मते नको आहेत. कारण, तसे असते तर त्यांनी हा निधी रोखला नसता.

पाचपुते म्हणाले, की गावचा सुरू असणारा विकास थांबविण्यासाठी निधी मिळालेला नाही. यात नागरी सुविधा, जनसुविधा, आमदार निधी, खासदार निधी, १५ वा वित्त आयोग (जिल्हा परिषद स्तर), १५ वा वित्त आयोग (पंचायत समिती स्तर) या महत्त्वाच्या निधींचा समावेश आहे.

sajan pachpute criticize sujay vikhe over kasthi village development work  funding politics ahmednagar
Ahmednagar News : पुणे महामार्गावरील पथदिव्यांचे लोकार्पण; जनता पाठीशी, घाबरत नाही - बाळासाहेब थोरात

आमच्यावर कुणाचा राग असेल तर त्याबद्दल आमच्याशी भांडावे, पण गावाला कुणीही वेठीस धरू नये. सरकारचा निधी हा कुणाची मक्तेदारी नाही, तरीही आम्ही गावाचा विकास सुरूच ठेवला आहे. काष्टीकरांनी गेल्या वेळी खासदार विखे यांना मते दिली आहेतच ना, मग तरीही त्यांचा गावावर एवढा राग का आहे, असा सवालही साजन पाचपुते यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com