
Indiranagar, Sangamner: Husband kills wife, commits endlife after frequent disputes.
संगमनेर : शहरातील इंदिरानगरमध्ये पतीने पत्नीचा खून करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (ता.७) दुपारी पावणे तीन वाजता उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.