
संगमनेर: तालुक्यातील नान्नज दुमाला येथील आदिवासी बांधवांनी बुधवारी (ता.३) संगमनेर पंचायत समितीवर मोर्चा काढत घरकुल, शौचालय, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांच्या मागणीसाठी संताप व्यक्त केला. महिलांसह तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. आम्हाला हक्काची घरकुलं द्या, ग्रामसेवकाची तातडीने बदली झालीच पाहिजे, मतदानाच्या वेळीच का आठवतो आम्ही? अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.