esakal | राहुरीत सत्ताधारी सदस्य फुटल्याने विरोधकांच्या हाती सरपंचपद; आमने-सामने भिडले कार्यकर्ते
sakal

बोलून बातमी शोधा

sarpanch

राहुरीत सत्ताधारी सदस्य फुटल्याने विरोधकांच्या हाती सरपंचपद

sakal_logo
By
पुरुषोत्तम कुलकर्णी

राहुरी (जि. नगर) : राहुरी खुर्दच्या सरपंच निवडप्रसंगी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत जनसेवा मंडळाचे दोन सदस्य ऐन वेळी फुटले. भाजपप्रणीत बुवासाहेब ग्रामविकास मंडळाच्या मालती अंबादास साखरे विजयी ठरल्या. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी तत्काळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून, आमने-सामने भिडलेल्या कार्यकर्त्यांना पांगविल्याने तणाव निवळला. (Sarpanch-post-election-in-rahuri-khurd-nagar-political-news)

अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा सत्ता काबीज

राहुरी खुर्दच्या सरपंच निर्मला मालपाणी यांचे निधन झाल्याने रिक्त पदासाठी (गुरुवारी) निवडणूकप्रक्रिया झाली. मालती साखरे यांना सात, तर जनसेवा मंडळाच्या मंगल मुकुंद शेडगे यांना सहा मते मिळाली.

सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी बुवासाहेब ग्रामविकास मंडळाचा पराभव करून, दहा वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या जनसेवा मंडळाने सत्तांतर घडविले होते. ‘जनसेवा’चे नऊ, तर ‘ग्रामविकास’चे सहा सदस्य विजयी झाले. ‘जनसेवा’च्या निर्मला मालपाणी बिनविरोध सरपंच झाल्या. मात्र, अवघ्या सहा महिन्यांत ‘ग्रामविकास’चे नेते तनपुरे कारखान्याचे संचालक नंदकुमार डोळस यांनी पुन्हा सत्ता काबीज केली.

हेही वाचा: गर्भपात, अत्याचार गुन्ह्यातील वाढविली कलमे

तणावपूर्ण परिस्थिती झाली निर्माण

निवडणूकप्रक्रियेत प्रसंगी दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने उभे ठाकले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर हमरीतुमरी, आरडाओरडा व झटापट सुरू झाली. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांचा फौजफाटा वाढविला. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगविले. नंतर तणाव निवळला.

उपसरपंच तुकाराम बाचकर, सदस्य मीना घोणसे, मनीषा शेंडे, शिवाजी पवार, पोपट चोपडे, मालती साखरे, मंगल शेडगे, नरेंद्र शेटे, लता माळी, असफखान पठाण, सविता धोत्रे, राम तोडमल, प्राजक्ता शेटे यांनी मतदानप्रक्रियेत भाग घेतला.

(Sarpanch-post-election-in-rahuri-khurd-nagar-political-news)

हेही वाचा: पासवर्डशिवाय कनेक्ट करा वायफाय; फॉलो करा 'या' टीप्स

loading image