
देवदैठण (ता.श्रीगोंदा ) येथील योगेश्वर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते व शेतक-यांनी प्रजासत्ताक दिनी राळेगणसिद्धी हजारे यांची भेट घेऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना हजारे बोलत होते.
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे पत्र शेतक-यांच्या हिताचे वा अपेक्षापूर्ती नव्हते, त्यात फक्त आकडेवारी होती. किती कोटी दिले अशी नुसती आकडेवारी सांगून काय उपयोग ? शेतक-यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने काय केले ते सांगा ? हा खरा प्रश्न असून त्याबाबत केंद्रिय कृषीमंत्र्यांना पत्र पाठवून आपण विचारणा करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
देवदैठण (ता.श्रीगोंदा ) येथील योगेश्वर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते व शेतक-यांनी प्रजासत्ताक दिनी राळेगणसिद्धी हजारे यांची भेट घेऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना हजारे बोलत होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
हजारे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये दिल्लीच्या रामलिला मैदानावरील आंदोलनात गरिब व अल्पभूधारक शेतक-यांना दरमहा पाच हजार रूपये पेंशन देण्याची मागणी आपण केली होती. सरकारने वर्षाला सहा हजार रूपये दिलेत. म्हणजे महिन्याला फक्त पाचशे रूपये. त्यातून शेतक-यांना जगण्यापुरताही आधार मिळत नाही. रामलिला मैदानावर उपोषण केले तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानाने मुंबईहून दिल्लीला आले व पंतप्रधान कार्यालयाचे लेखी पत्र आणून त्यांनी माझे उपोषण सोडवले होते.
उर्जामंत्री राऊत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, वाचा कोणी केली मागणी?
त्यावेळच्या लेखी आश्वासनाची अद्यापही पुर्तता न झाल्याने आता मला तुमच्याशी बोलायचे नाही असे आपण त्यांना सांगितले होते. आश्वासने पाळत नाही, मग उपोषण करू नका, असे कशाला सांगता? असा प्रश्न त्यांना विचारल्याचे हजारे यांनी म्हणाले.
योगेश्वर शेतकरी संघटनेचे विलास वाघमारे, माजी सरपंच विलास पोटे, राजेंद्र गाडेकर, रवींद्र धनक, दिपक गायकवाड, रमेश जठार, संजय कोठावळे, अशोक सातपुते, संजय साळवे, गोविंद इथापे, येधु पवार, डॉ. सचिन पडवळ, संतोष बनकर आदींनी भेट दिली.
शासकीय पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो कसाही ही उधळणे बरोबर नाही. रामलिला मैदानावरील लेखी पत्राची आश्वासनपुर्ती न झाल्याने मुंबई ते दिल्ली विमान प्रवास तिकीटाचा शासकीय तिजोरीतून झालेला खर्च स्वखर्चाने पुन्हा तिजोरीत भरा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण करणार आहे.
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक