जेष्ठ विचारवंत तथा गणित तज्ञ एन.डी.सानप यांचे कोरोनाने निधन

जेष्ठ विचारवंत तथा गणित तज्ञ एन.डी.सानप यांचे कोरोनाने निधन
Summary

एन.डी. सानप यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा, पाटोदा, नगर व जामखेड तालुक्यातील विविध शाखांमध्ये गणिताचे अध्यापक म्हणून सेवा केली.

जामखेड (अहमदनगर) : समाज प्रबोधनासाठी पाच हजाराहून अधिक विनामूल्य व्याख्याने देणारे जेष्ठ विचारवंत तथा गणित तज्ञ एन.डी.सानप यांचे कोरोनाच्या संसर्गाने नगर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी सौताडा (ता.पाटोदा जि.बीड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने जामखेडकर दोन पिढीच्या मार्गदर्शकाला मुकले आहेत. (Senior thinker and mathematician ND Sanap has passed away due to corona)

जेष्ठ विचारवंत तथा गणित तज्ञ एन.डी.सानप यांचे कोरोनाने निधन
नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेडसह 'या' जिल्ह्यांना धोक्याची घंटा; येत्या तीन तासात जोरदार पाऊस!

एन.डी. सानप यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा, पाटोदा, नगर व जामखेड तालुक्यातील विविध शाखांमध्ये गणिताचे अध्यापक म्हणून सेवा केली. छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर तीन वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. मात्र निवृत्तीनंतरही त्यांनी आपला अध्यापनाचा व्यासंग जपला होता.

जेष्ठ विचारवंत तथा गणित तज्ञ एन.डी.सानप यांचे कोरोनाने निधन
40 वर्षांच्या अविरत मेहनतीनंतर भाजप सत्तास्थानी; अहमदनगर जिल्ह्यात पक्षाची खडतर वाटचाल

एन.डी.सानप हे गणित तज्ञ होते. त्याच बरोबर त्यांचा साहित्य व संत वाड्मयाचा गाढा अभ्यास होता. चाळीस वर्षात त्यांनी कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर ज्योतिबा फुले, शिक्षणाचा अध्यप्रवर्तक सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर पाच हजारांहून अधिक व्याख्याने राज्याच्या कानाकोपऱ्यात विनामूल्य दिले. इतिहासाचे व युगपुरुषांच्या जीवनचरित्राचा अभ्यास त्यांचा होता. अध्यात्मिक संत वांड्मयाचाही मोठा व्यासंग त्यांनी जपला होता.

जेष्ठ विचारवंत तथा गणित तज्ञ एन.डी.सानप यांचे कोरोनाने निधन
आमदारांपेक्षा आम्ही जास्त कामं केली; अहमदनगर झेडपी सभापती काशिनाथ दाते

शिस्तप्रिय आणि साधी राहणी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व समाजात ते लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तसेच जामखेड येथील पर्यावरण संवर्धनासाठी सायकलींचा ग्रुप विकसित करणारे डॉ. पांडुरंग सानप यांचे ते थोरले बंधू होत. (Senior thinker and mathematician ND Sanap has passed away due to corona)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com