esakal | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’
sakal

बोलून बातमी शोधा

Service Week on the occasion of Prime Minister Narendra Modi birthday in Akole

जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व व गोरगरीब, वंचित, दलित, अदिवासी व शेतकरी यांच्यासाठी देवदूताप्रमाणाने काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व व गोरगरीब, वंचित, दलित, अदिवासी व शेतकरी यांच्यासाठी देवदूताप्रमाणाने काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने १४ ते २० सप्टेंबर दरम्यान विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे नेते माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिली.

हेही वाचा : सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जातंय
अकोले येथील भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत माजी आमदार पिचड बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे होते. जिल्हा परिषदेचे गटनेते व निरिक्षक जालिंदर वाकचौरे, पक्षाचे तालुका प्रभारी सुधाकर गुंजाळ, शिवाजीराव धुमाळ, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दता देशमुख, अगस्ती कारखान्याचे संचालक अशोक देशमुख, गिरजाजी जाधव, पंचायत समितीचे सदस्य माधवी जगधने, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, मच्छीद्र मंडलिक, दीपक शेटे, मच्छीद्र चौधरी, सुनिल उगले, अनिकेत अवारी, गंगाराम नलावडे, युवा नेते राहुल देशमुख, सुशांत वाकचौरे उपस्थित होते.

या सेवा सप्ताहमध्ये प्रत्येक मंडलात ७० दिव्यांगांन विविध वस्तू वाटप केल्या जाणार आहेत. रुग्णांना फळे वाटप, कोरोनाबधितांना प्लाझ्मा दान करण्यात येणार आहे. युवा मोर्चाच्या वतीने ७० ठिकाणी रक्तदान शिबीर, प्रत्येक बुथवर ७० वृक्ष लागवड यासह पर्यावरण संरक्षण संकल्प, स्वच्छता अभियान होणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्त्रोत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबरला प्रत्येक कार्यकर्त्याने आपले बूथ वर जयंती साजरी करावी. आपल्या घरावर पक्षाचा झेंडा फडकविला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक बूथ कार्यकर्त्यांनी या सेवा काळात प्रयत्न करावा. नरेंद्र मोदी यांच्या जीवनकार्याचा प्रचार व प्रसार करावा असेही आवाहन वैभवराव पिचड यांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर