esakal | श्रीरामपुरात साडेचार लाखांचा गांजा पकडला

बोलून बातमी शोधा

Seven and a half lakh cannabis seized in Shrirampur city

श्रीरामपुरात साडेचार लाखांचा गांजा पकडला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

श्रीरामपूर ः येथील पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे शहरातील प्रभाग सात मधील देवकर वस्ती येथे पहाटे छापा टाकुन सुमारे साडेचार लाख रुपयांचा अवैध गांजा पकडला.

या प्रकरणी पोलीसांनी गणेश भास्कर सरोदे (वय ३८, रा. देवकर वस्ती, प्रभाग सात) याला ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

हेही वाचा: ह्रदयद्रावक ः दोन्ही मुले नाही आली, तहसीलदारांनीच दिला अग्निडाग

आज पहाटेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, सहायक पोलीस निरिक्षक संभाजी पाटील यांनी ही धडक कारवाई केली.

पोलिसांनी देवकर वस्ती परिसरात जावून छापेमारी टाकुन अवैध गांजा विक्री करीत असलेला गणेश भास्कर सरोदे याला ताब्यात घेतले. पोलीसांनी त्याच्याकडुन चार लाख ६० हजार रुपये किमतीचा ४६ किलो अवैध गांज्यासह चार लाख रुपये किमतीची बोलेरो पिकप असा एकूण आठ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जोसेफ साळवी, पोलीस शिपाई पंकज गोसावी, सुनील दिघे, राहुल नरवडे, किशोर जाधव, पोलीस नाईक बिरप्पा करमल यांनी ही कारवाई केली.

बातमीदार - गौरव साळुंके