

Newasa Leopard Scare: 13 Traps Installed After Reports of 70 Leopards; Manpower Crisis Deepens
Sakal
-विनायक दरंदले
सोनई : नेवासे तालुक्यात यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे ओढे, नाले व नद्यास आजही पाणी वाहते असल्याने शेती, वाड्यावस्त्यांवर तसेच लोकवस्तीत बिबट्यांचा वावर वाढला आहे. रोज शेळी, मेंढी, बोकड आणि कुत्र्यांवर हल्ले सुरु झाल्याने धाकधुक वाढली आहे. दोन दिवसांपुर्वी सोनई- हनुमानवाडी रस्त्यावर अक्षय टिक्कल (वय-२६) या युवकाच्या मोटारसायकलवर बिबट्याने झेप घेतल्याच्या घटनेने भितीदायक वातावरण निर्माण झाले. अवघे पाच कर्मचारी असल्याने वन विभागाचे काम सध्यातरी रामभरोसे असल्याचे बोलले जात आहे.