
अहिल्यानगर : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये बनावट ॲपसह अतिरिक्त अनावश्यक कर्मचारी भरतीसह अनेक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. देवस्थानचे विश्वस्त- अधिकारी आणि गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्यांना सरकार आणि शनिदेवाच्या प्रक्षोभास सामोरे जावे लागणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.