
सोनई : शनिशिंगणापुरात स्वयंभू शनिमूर्तीच्या साक्षीने अॅप मालक व रॅकेट मधील पुरोहितांनी राज्य व देशभरातील भाविकांची साडेसाती निवारण पूजा, अभिषेक व मूर्तीला तेल अर्पण करून कोट्यावधी रुपायांची माया जमविल्याचा आरोप पुढे आल्यानंतर संशयित म्हणून असलेले सर्व व्यक्ती आता साडेसातीच्या फेऱ्यात अडकू लागले आहेत. ट्रस्टचा मुख्य पुजारी म्हणून राज्यभर अर्थपूर्ण दौरे करणाऱ्या वारकरी संप्रदायातील ‘त्या’ कीर्तनकार महाराजांच्या विरोधात देवस्थान कारवाई करत नसल्याने चर्चा घडत आहेत.