

Aurangabad Bench to deliver final hearing in Shaneshwar Devasthan case — devotees await clarity on temple management.
Sakal
सोनई : शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टचा कारभार नेमका कुणी पाहायचा याबाबत आज औरंगाबाद उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलाने सरकारच्या बाजूने प्रतिज्ञापत्र देण्यास वेळ मागितल्याने न्यायमूर्तींनी गुरुवारी (ता.१३) अंतिम सुनावणी केली जाईल, असे सांगितले आहे. तीन दिवसाने होणाऱ्या अंतिम सुनावणी विषयी बरखास्त केलेले विश्वस्त मंडळ, नव्याने कारभार पाहात असलेली कार्यकारी समितीसह जिल्ह्यात निकालाची उत्सुकता लागली आहे.