esakal | शेवगावात महिन्यात 870 बाधित, दोन महिन्यात चौघांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

In Shevgaon 870 corona patients have been found in a month

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शेवगाव प्रशासन सज्ज झाले आहे. गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत तालुक्‍यातील 3678 जणांना कोरोनाची लागण झाली.

शेवगावात महिन्यात 870 बाधित, दोन महिन्यात चौघांचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेवगाव (अहमदनगर) : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर तालुक्‍यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 3678 असून त्यात चालू वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून 870 रुग्णांचा भर पडली आहे. दोन महिन्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात 31 हजार नवीन वीजजोडणी कार्यान्वित

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शेवगाव प्रशासन सज्ज झाले आहे. गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत तालुक्‍यातील 3678 जणांना कोरोनाची लागण झाली. चालू वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून 870 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या बळींची संख्या 40 वर गेली आहे. कोरोनाचे सावट मध्यंतरी चार-पाच महिने दुर झाले होते. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी पासून संसर्गात पुन्हा वाढ झाल्याने कोरोना चाचणी करणाऱ्या व लस घेणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे.

अवैध वाळूउपसा होऊ देणार नाही : डॉ. सुजय विखे पाटील

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहात कोरोना बाधितांसाठी कोवीड सेंटर पुन्हा सुरु झाले. तेथे 50 बेडची सुविधा उपलब्ध असून तेथे सध्या 22 रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयात कोवीड रुग्णांसाठी 24 बेडची सुविधा उपलब्ध असून तेथे 15 रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे, डॉ. दीपक परदेशी, डॉ. विजय लांडे यांच्या निगराणीखाली आरोग्य विभाग उपाय योजना करत आहे. 

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरीकांनी घाबरुन न जाता नियमावलीचे पालन करावे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास चाचणी करुन त्यानुषांगाने उपचार घ्यावेत. तसेच 45 वर्षावरील नागरीकांनी लसीकरण करुन आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे. 
- डॉ. रामेश्वर काटे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामिण रुग्णालय