शेवगाव : देशात दहापट इथेनॉलची गरज ; गडकरी

‘‘साखर कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीवर भर द्यावा.
Nitin Gadkari on Ethanol
Nitin Gadkari on EthanolSakal

शेवगाव : ‘‘साखर कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीवर भर द्यावा. पेट्रोलऐवजी शंभर टक्के बायोइथेनॉल वापरता येणे शक्य आहे. सध्या देशात ४५० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होते. आगामी काळात बहुतेक वाहने इथेनॉलवर चालविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सध्याच्या निर्मितीपेक्षा दहा पटीने अधिक निर्मितीची गरज आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. (Nitin Gadkari on Ethanol)

शेवगाव तालुक्यातील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ३० केएलपीडी क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी गडकरी यांनी व्हर्चुअल पद्धतीने दिल्लीतून भाषण केले. कारखाना कार्यक्षेत्रावर या प्रकल्पाचे भूमिपूजन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मंत्री बबनराव ढाकणे, कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे, तसेच मान्यवर उपस्थित होते.

दिल्लीतील कार्यक्रमांमुळे गडकरी येथील कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांनी व्हर्च्युअल पद्धतीने भाषण केले. ते म्हणाले, की संघर्षयोद्धा म्हणून बबनराव ढाकणे यांचा परिचय आहे. ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ या संपादित ग्रंथाचे प्रकाशन झाले. हा ग्रंथ तरुणांना प्रेरणादायी ठरेल. ढाकणे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साखर कारखाना चालविला. देशात सध्या साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा जास्त आहे. ४० हजार कोटींची साखर निर्यात केली आहे.

आता कारखान्यांनी साखरेबरोबरच इथेनॉलच्या निर्मितीवर भर द्यावा. वाहनांना पेट्रोलऐवजी शंभर टक्के इथेनॉल कसे वापरता येईल, यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com