
फिर्यादीत म्हटले आहे की, स्थानिक गुन्हे शाखेस शहरातील प्रमुख शिवाजी चौक, क्रांती चौक व आंबेडकर चौकात मावा विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली.
शेवगाव (अहमदनगर) : शहरातील मुख्य चौकात मावा विक्री करणा-या सहा जणांविरुध्द नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ३४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पो.काँ. विनोद मासाळकर यांच्या फिर्यादीवरुन सहा जणाविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, स्थानिक गुन्हे शाखेस शहरातील प्रमुख शिवाजी चौक, क्रांती चौक व आंबेडकर चौकात मावा विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखालील पाच जणाच्या पथकाने रविवार (ता.२४) रोजी दुपारी या तीनही ठिकाणी छापा टाकला.
हरभरा 'घाट्यात' अळी! बदलत्या हवामानाच्या शेतकरी चिंतेत
त्यामध्ये असिफ मोहम्मद शेख (वय ४०) राहणार काझी गल्ली शेवगाव, सय्यद जुनेद जावेद (वय २१), अस्लम सत्तार पठाण (वय २४) दोघे राहणार नाईकवाडी मोहल्ला शेवगाव, शाकीर मोहम्मद शेख (वय २६) राहणार गेवराई रोड शेवगाव, जय नारायण पवार (वय ३०) राहणार अजिंक्य नगर शेवगाव, आकाश अशोक चव्हाण (वय २३) राहणार गणेश नगर शेवगाव हे सहा जण राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू व मावा शरिरास अपायकारक असल्याचे माहित असतानाही ते तयार करुन त्याची विक्री करताना आढळून आले. त्यांच्या विरुध्द कारवाई करुन ३४ हजार ८०० रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू, सुपारीपासून तयार केलेला मावा, सुपारी चुरा असे साहीत्य जप्त केले आहे. या कारवाईत पो.काँ.विनोद मासाळकर, संतोष लोढे, राहुल सोळुके, रोहीदास नवगिरे व प्रकाश वाघ यांनी सहभाग घेतला.