शिक्षक बँकेने कर्जमाफ करून दिली कर्जदारास मदत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

रतन साळवे यांच्या कुटुंबीयांना प्राथमिक शिक्षक बॅंकेकडून 15 लाखांच्या, तर मित्रपरिवार, "शिक्षक भारती' व जिल्ह्यातील शिक्षकांनी जमा केलेल्या मदतीच्या धनादेशाचे वितरण आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

नगर ः ""कर्जदाराचे निधन झाल्यानंतर ते वसूल केले जात आहे. मात्र, प्राथमिक शिक्षक बॅंक कर्जदाराचे कर्ज माफ करून त्यांना आर्थिक मदत करीत आहे. राज्यातील नव्हे, तर देशातील ही अशी पहिलीच बॅंक आहे,'' असे प्रतिपादन शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक तथा आमदार कपिल पाटील यांनी केले. 

शिक्षक भारती संघटनेचे उपाध्यक्ष तथा शिक्षक रतन साळवे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सभागृहात आयोजित शोकसभेत पाटील बोलत होते.

हेही वाचा - अहमदनगर कलेक्टर राहतात महालात

या प्रसंगी रतन साळवे यांच्या कुटुंबीयांना प्राथमिक शिक्षक बॅंकेकडून 15 लाखांच्या, तर मित्रपरिवार, "शिक्षक भारती' व जिल्ह्यातील शिक्षकांनी जमा केलेल्या मदतीच्या धनादेशाचे वितरण आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी बापूसाहेब तांबे, शरद सुद्रिक, बॅंकेचे अध्यक्ष राजू रहाणे, "शिक्षक भारती'चे सुनील गाडगे, सरपंच आप्पासाहेब शिंदे, दत्ता कुलट, दिलीप मुरदारे आदी उपस्थित होते. पत्रकार चांद शेख यांनी सूत्रसंचालन केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shikshak Bank forgives loan to help borrower