Shirdi: शिर्डीत पाच दिवसांत सात लाख लाडूंची विक्री! विक्रीत मोठी वाढ; दररोज तयार होतात दीड लाख लाडू

Shirdi: शिर्डीत पाच दिवसांत सात लाख लाडूंची विक्री! विक्रीत मोठी वाढ; दररोज तयार होतात दीड लाख लाडू

सलग सुट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढल्याने साईबाबांचा प्रसाद म्हणून साईसंस्थानतर्फे बनवल्या जाणाऱ्या बुंदीच्या लाडू विक्रीत मोठी वाढ झाली.

Shirdi Ladoo Sell: सलग सुट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढल्याने साईबाबांचा प्रसाद म्हणून साईसंस्थानतर्फे बनवल्या जाणाऱ्या बुंदीच्या लाडू विक्रीत मोठी वाढ झाली. गेल्या पाच दिवसांत एकूण सात लाख लाडूंची विक्री झाली. सोमवारी (ता.२५) सर्वाधिक दीड लाख लाडू विकले.

दर्शनार्थी भाविकांना प्रसाद स्वरूपात साडेतीन लाख बुंदी पाकिटे मोफत वितरीत करण्यात आली. मागील अनुभव लक्षात घेता येत्या ३१ डिसेंबर रोजी अडीच ते तीन लाख लाडूंची विक्री होईल, असा अंदाज आहे. हे लक्षात घेऊन साईसंस्थानच्या भटारखान्यात दररोज दीड लाख लाडू तयार केले जात आहेत.

राज्यातील एखाद्या देवस्थानात तयार केल्या जाणाऱ्या लाडूंची ही सर्वाधिक संख्या आहे. लाडू तयार करण्यासाठी शंभर ते सव्वाशे कर्मचारी कार्यरत आहेत. डाळ दळून तयार केलेल्या बेसनापासून लाडू तयार केले जातात. ३१ डिसेंबरपर्यत भाविकांची गर्दी कायम राहणार असल्याने सध्या लाडू तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. तयार झालेले लाडू थोडेसे वाळवून कागदी पिशवीत सिलबंद करून विक्रीसाठी पाठवले जातात. गर्दीचा ओघ कायम असल्याने तयार झालेल्या लाडूपैकी पन्नास ते साठ टक्के लाडूंची दररोज विक्री होते. (Latest Marathi news)

हा घ्या लाडू

एक क्विंटल साखर, पासष्ट किलो हरभरा दाळ, ७२ किलो साजूक तूप, तीन किलो काजू, दोन किलो बेदाणे, अर्धा किलो वेलदोडे आणि दूध अर्धा लिटर यापासून सुमारे पाच हजार लाडू तयार होतात. आचाऱ्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास एक क्विंटल साखरेसह वरील सर्व पदार्थांपासून पाच हजार लाडू तयार होतात. एक लाडू तयार करण्यासाठी सुमारे बारा रुपये खर्च येतो. या पन्नास ग्रॅम वजनाच्या एका लाडूची साईसंस्थान दहा रुपयांना विक्री करते. याशिवाय साईदर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांना पन्नास ग्रॅम वजनाचे बुंदीचे पाकीट प्रसाद स्वरूपात मोफत दिले जाते.

Shirdi: शिर्डीत पाच दिवसांत सात लाख लाडूंची विक्री! विक्रीत मोठी वाढ; दररोज तयार होतात दीड लाख लाडू
Mumbai-Ayodhya Flight : मुंबई ते अयोध्या थेट विमानसेवा कधीपासून सुरू होणार? 'इंडिगो'ने दिलं उत्तर

एकवीस ते पंचवीस डिसेंबरपर्यत साईसंस्थानने दर्शनार्थी भाविकांना सुमारे साडेतीन लाख बुंदी पाकिटे प्रसाद स्वरूपात मोफत वितरीत केली. गेल्या पाच दिवसांत साडेतीन लाख भाविकांनी साईदर्शन घेतले. ही संख्या मोठी आहे. लाडूच्या स्वादात आणि सुकामेव्याच्या प्रमाणात वाढ करण्याची गरज आहे.- कैलास कोते, माजी नगराध्यक्ष(Latest Marathi news)

साईसंस्थानचे वरिष्ठ अधिकारी आंध्र प्रदेशातील तिरूपती देवस्थानचे अनुकरण करण्यावर भर देतात. येथे रूजू होणारे बरेच अधिकारी तिरूपतीचा अभ्यास दौरा करतात. मात्र, अद्यापही तिरूपतीसारखे शुध्द तूप आणि सुकामेव्यात तयार होणारे लाडू येथे तयार करण्याचा विचार एकाही अधिकाऱ्याने केला नाही. साईसंस्थानचे लाडू हे तिरूपती देवस्थानासारखे असावेत, अशी भाविकांची अपेक्षा आहे. ग्रामस्थांची देखील मागणी आहे. ही मागणी वेळोवेळी साईसंस्थान प्रशासनाकडे केली आहे- अभय शेळके, माजी नगराध्यक्ष, शिर्डी

Shirdi: शिर्डीत पाच दिवसांत सात लाख लाडूंची विक्री! विक्रीत मोठी वाढ; दररोज तयार होतात दीड लाख लाडू
Jolly Bastian: सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या दबंग स्टंटमॅनचा मृत्यू! कारणही आलं समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com