

An emotional Rajendra Pathare breaks down after learning about his expulsion from Shiv Sena.
Sakal
राहाता: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, माजी नगरसेवक सागर लुटे आणि उज्ज्वला होले यांची हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईनंतर पत्रकारांसमोर आपली कैफीयत मांडताना माजी उपनगराध्यक्ष पठारे भावूक झाले. निष्ठावान शिवसेना कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. पठारे हे पक्षाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होते.