नगरची शिवसेना एकसंधच : संजय शेंडगे; संपर्क प्रमुख यांना बदनाम "त्यांचे' षडयंत्र

अमित आवारी
Wednesday, 30 September 2020

नगर महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून शहर शिवसेनेत दोन गट असल्याची चर्चा आहे. या निवडीबद्दल शहरत उलट सुलट चर्चा होते आहे.

नगर : महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून शहर शिवसेनेत दोन गट असल्याची चर्चा आहे. या निवडीबद्दल शहरत उलट सुलट चर्चा होते आहे. शिवसेनेमध्ये कधीही जातिवादाला थारा दिला जात नाही; उलट नगरची शिवसेना एकसंधच आहे, असे शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय शेंडगे यांनी म्हंटले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पक्षाकडून स्वर्गीय अनिल राठोड यांनी शिवसेना सचिव अनिल देसाई यांना जाहीर केलेल्या नावाचे उमेदवार पुन्हा या निवडणुकीला सामोरे जात आहेत. सध्या कार्यरत असलेले संपर्कप्रमुख हे वरिष्ठांचे आदेश पाळणारे एक सच्चे शिवसैनिक आहेत. आज वर त्यांनी पक्षातील अनेक महत्त्वाची पदे उपभोगली आहेत. सर्वांना एकजुट करून संघटना वाढीसाठी काम करण्याचा त्यांना दांडगा अनुभव देखील आहे. यामुळेच नगर येथे संपर्कप्रमुख कार्यरत झाल्यापासून शिवसेनेने एकदा महापौरपदी व दोनदा पोटनिवडणुकीत भगवा फडकवला आहे. तरी देखील स्थानिक पातळीवरील राजकारणात काही पदाधिकारी हे त्यांच्या मर्जी प्रमाणे काही गोष्टी न घडल्यास त्यांचा आगडोंब उसळवितात. 

हेही वाचा : शेतकरी गाढ झोपेत असतानाच कांदा चाळ पेटवली; सुमारे चाडेचार लाखाचे नुकसान
संपर्कप्रमुख व शिवसेनेतील काही नगरसेवक यांना नाहक बदनाम करण्याचे कारस्थान ते सातत्याने रचतात. तरीही या कुटाळक्‍या व पक्ष श्रेष्टी यांना बदनाम करण्यापेक्षा शिवसेनेच्या ऐक्‍यासाठी विरोधकांना उत्तर देण्यासाठी कठोर कार्य करावे. आपआपसात केले जाणारे हेवे दावे थांबवावे. संघटना वाढीसाठी भर द्यावा हे संघटनेच्या हिताचे आहे, असा सल्ला संजय शेंडगे यांनी शिवसेनेतील एका गटाला दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena political story in the Municipal Corporation