esakal | वाळू माफियांविरोधात धडक मोहिम; नव्या पोलिस निरीक्षकांनी महिन्याभरातच घातला लगाम !

बोलून बातमी शोधा

In Shrigonde taluka after Inspector of Police Sampat Shinde took over the post there is a positive picture that sand theft has been stopped for a month}

बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत माठ, म्हसे, राजापूर, दाणेवाडी, बेलवंडी या भागात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सर्रास वाळू चोरी सुरू आहे.

वाळू माफियांविरोधात धडक मोहिम; नव्या पोलिस निरीक्षकांनी महिन्याभरातच घातला लगाम !
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍यात भीमा, घोड या महत्त्वाच्या नद्यांतून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सर्रास सुरू असते. ही वाळू चोरी थांबवण्यासाठी मोठा पाठपुरावा सुरू असला तरी प्रशासन गांभीर्य दाखवत नाही. बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरापासून त्यांच्या हद्दीतील वाळूचोरी बंद असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.

ऑनलाइन योग स्पर्धेसाठी सातशे स्पर्धकांची नोंदणी 
 
बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत माठ, म्हसे, राजापूर, दाणेवाडी, बेलवंडी या भागात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सर्रास वाळू चोरी सुरू आहे. घोडपात्रात अवैधरित्या बोटी टाकून बिनधास्तपणे वाळू चोरी केली जाते. यात श्रीगोंदे तालुक्‍यासह शिरूर तालुक्‍यातील वाळू चोरांचा समावेश आहे. मध्यंतरी श्रीगोंद्यातील वाळू चोरीला कंटाळलेल्या शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी हद्द ओलांडत श्रीगोंद्यातील वाळूचोरीवर कारवाई करण्याचे धाडस दाखवले. मात्र त्या वेळचे तहसीलदार अथवा पोलिस निरीक्षक यांना ही वाळूचोरी थांबवण्याबाबत अपयश आले होते. 

माळवाडगाव येथे शासकीय हरभरा खरेदी केंद्रास प्रारंभ

या भागातील वाळूचोरी लोकांसाठी अडचणीचा विषय आहे. वाळू चोरीतून होणारे गुंडगिरी भविष्यात अडचणीचे ठरणार असली तरी त्यावर पोलिस ठाण्यातून कायमस्वरूपी उपाय करण्याऐवजी उलटा व्यवहार चालत असल्याचे अनेक वेळा समोर आले. तथापि महिनाभरापूर्वी बेलवंडी पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले पोलिस निरीक्षक शिंदे यांनी मात्र वाळू चोरांच्या विरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला. येथे आल्यानंतर त्यांनी वाळू चोरी बंद करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा. असा निरोप संबंधितांपर्यंत पोहोचला. तरीही काही प्रमाणात सुरू असणाऱ्या वाळूचोरी वर थेट कारवाई करील शिंदे यांनी गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू केले. त्यामुळे त्या भागातील वाळूचोरी बऱ्याच अंशी थांबल्याची परिस्थिती आहे. 

वडगावशिंदोडी येथे वाळू लिलावाला विरोध
 
याच हद्दीतील वडगावशिंदोडी या गावात घोड नदीपात्रातील वाळूचा लिलाव करण्यास गावकऱ्यांनी विरोध केला आहे. याबाबत ग्रामसभेत निर्णय झाल्याची महिमा समजली. म्हसे येथे याबाबत ग्रामसभा होत आहे. 

ज्या भागात वाळूचे लिलाव होतील, तेथे नियमाप्रमाणे वाळू उपसा होईल. मात्र बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळू चोरी होऊ देणार नाही. त्या भागातील संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिल्या असून, वाळू चोरी थांबवण्यासाठी नागरिकांनीही पुढे येऊन मदत करावी. 
- संपत शिंदे, पोलीस निरीक्षक, बेलवंडी.