esakal | श्रीरामपूर-जेजुरी एसटी बस सेवा सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी बस

श्रीरामपूर-जेजुरी एसटी बस सेवा सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : येथील एसटी बस आगारातून नुकतीच श्रीरामपूर ते जेजुरी बस सेवा सुरु केल्याची माहिती श्रीरामपूर एसटी आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी दिली.

श्रीरामपूर येथील जेजुरीसाठी बस सकाळी साडे दहा वाजता सुटणार आहे. तसेच जेजुरीहून सकाळी सहा वाजता ही बस श्रीरामपूरसाठी सुटणार आहे. ही बस संगमनेर, आळेफाटा, स्वारगेट बस स्थानक, सासवड मार्गे जेजुरीला जाणार आहे. तसेच सकाळी साडेआठ वाजता संगमनेर मार्गे श्रीरामपूर ते पुणे, शिवाजीनगर बस सेवा उपलब्ध केली आहे. शिवाजीनगर बस स्थानकातून दुपारी दीड वाजता माघारी सुटणार आहे.

हेही वाचा: सुसंस्कृत पुण्यात लाजिरवाणी घटना; अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

या बस सेवेमुळे संगमनेर, आळेफाटा पुणे मार्गावर जाण्यासाठी प्रवाशांना सोईस्कर पडणार आहे. श्रीरामपूर ते जेजुरी बस सेवेचे वाहतूक अधीक्षक किरण शिंदे, प्रितम बोरावके यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी जेजुरी बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य प्रवासी संघटनेने केले आहे.

loading image
go to top