श्रीरामपूर : अज्ञात चोरट्यांनी मेडिकल फोडून २१ लाख चोरले

अज्ञात चोरट्यांनी शहरातील मोरगे हॉस्पिटल मधील मेडिकल फोडून सुमारे २१ लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.
theft
theftsakal

श्रीरामपूर, (जि. अहमदनगर) - अज्ञात चोरट्यांनी शहरातील मोरगे हॉस्पिटल मधील मेडिकल फोडून सुमारे २१ लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी ज्ञानदेव मोरगे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास चेहऱ्याला मास्क लावुन दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी भिंतीवरुन उडी टाकून येथील मोरगे हॉस्पिटल मध्ये आत प्रवेश केला. एकाने गेट बाहेर उभ्या असलेल्या वॉचमनला चाकुचा धाक दाखवून धमकाविले. तर दुसऱ्या चोरट्याने कटरच्या सहाय्याने मेडिकलच्या शटरला लावलेले दोन्ही कुलूप तोडुन शटर उघडून आत प्रवेश केला.

theft
'महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले'

चोरांनी गजाच्या सहायाने मेडिकल मधील काॅउंटर उघडुन सुमारे २१ लाख रुपयांची रोख रक्कम पिशवीत भरुन चोरटे पसार झाले. वॉचमनला दमबाजी करुन चोरट्यांनी चोरी केल्यानंतर हॉस्पिटल बाहेर पडण्यापुर्वी सीसीटीव्हीचे शुटींगचे मशिन देखील चोरुन नेल्याचे समोर आले. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या मोरगे हॉस्पिटल मधील मेडिकल मध्ये अज्ञात चोरट्यांनी केलेल्या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष मोहिम राबविण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com