

Shrirampur: Youth seriously injured in a deadly attack over election dispute; police file FIR against four accused.
श्रीरामपूर: नगरपालिका निवडणुकीतील वैमनस्य रस्त्यावर उतरल्याची घटना हरेगाव फाटा परिसरात घडली. प्लॉट खरेदी-विक्री व्यवसाय करणारे सागर जगन्नाथ गंगावणे (३५, रा. वडाळा महादेव) यांच्यावर शनिवारी (ता. ६) रात्री सुमारे १० वाजता रॉड, तलवार व लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, विशेष कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.