esakal | AHMEDNAGAR : अखेर सीना धरण भरले; पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने सुखावला बळीराजा!
sakal

बोलून बातमी शोधा

Sina Dam

अखेर सीना धरण भरले; पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने सुखावला बळीराजा!

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

मिरजगाव (जि. अहमदनगर) : मागील अनेक महिन्यांपासून मिरजगाव व परिसरातील अनेक गावे प्रतीक्षा करत असलेले सीना धरण (Sina Dam) आता पूर्ण क्षमतेने भरले असून, जास्तीच्या पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला आहे.

सीना धरण परिसरात आनंदाचे वातावरण

कर्जत तालुक्यातील गावांसह आष्टी तालुक्यासाठी देखील वरदान ठरलेले हे धरण आता पूर्णपणे भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे. धरणातून सीना नदीपात्रात काल १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सद्य स्थितीला सीना दुथडी भरून वाहत असल्याने सीना पट्यातील ऊसबागायतदार व पशुपालक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा: रोहित पवारांनी जिंकली सामान्यांची मनं

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु यावर्षी लांबणीवर पडलेल्या पावसामुळे धरण भरू शकले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून सीना धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. पुढील दोन दिवसात धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज वर्तवला गेला असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, यामुळे प्रशानाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- सिना धरण पाणी क्षमता व सिंचन क्षेत्र

- पाणी पातळी : ५८४.०१ (मिटर)

- धरण क्षमता/एकूण साठा : २४००.०० (द.ल.घ.फु.)

- उपयुक्त साठा : १८४७.३३ (द.ल.घ.फु.)

- एकूण साठा टक्केवारी : १००%

- आजची आवक : ८८.६१ (द.ल.घ.फु.)

- एकूण आवक :१६४४.३२ (द.ल.घ.फु.)

- उजवा कालवा : १०० क्यूसेस

हेही वाचा: ग्रामसेवकाची नोकरी कुणी स्विकारेना; तब्बल 100 पदे रिक्त

- सांडवा विसर्ग : ५६.०० क्यूसेस

- सिंचन क्षेत्र : ८४४५ हेक्टर

- उजवा कालवा : ७६७२ हेक्टर व डावा कालवा : ७७३ हेक्टर

- उपसा सिंचन : १२०० हेक्टर.

- लाभ क्षेत्रातील तालुके : कर्जत, श्रीगोंदा व आष्टी तालुका.

loading image
go to top