सिन्नरचा तरूण हजार फूट खोल दरीत कोसळला अन्...

Sinnar's young man fell into the valley
Sinnar's young man fell into the valley

संगमनेर ः सावरगाव तळ येथील डोंगरकड्यावरून पाय घसरून तरुण आज सकाळी सुमारे एक हजार फूट खोल दरीत कोसळला. अशोक गणपत अघाणे (वय 35, रा. मनेगाव, ता. सिन्नर) असे त्याचे नाव आहे. 

सावरगाव तळ येथील वन विभागाच्या एक हजार फूट उंच डोंगराच्या कड्यावरून आज सकाळी सातच्या सुमारास तरुण दरीत पडला. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे त्याच्या जवळ जाण्यासही तो तयार नव्हता. 

ही घटना जंगलाजवळ वस्ती असलेल्या वैभव नेहे, सतीश नेहे, गोकुळ नेहे व माधव नेहे यांनी पाहिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांना माहिती दिली. त्यांनी शिवनाथ नेहे यांच्यासह तातडीने डोंगरावर धाव घेतली.

अतिशय गंभीर जखमी अवस्थेतील या तरुणाचे नाव अशोक अघाणे असल्याचे समजले. त्याच्या नातेवाइकांना अपघाताची माहिती देऊन तातडीने वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी गोरक्ष नेहे यांनी रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, शासकीय रुग्णवाहिका वेळेवर येत नसल्याचे पाहून खासगी रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलाविली. 

अनोखळी तरूणाजवळ कोणीही जात नव्हते

डोंगराच्या पायथ्याशी पडल्याने पाय फ्रॅक्‍चर झालेल्या अशोकला खाली सपाट भागात आणणे आवश्यक होते. कोरोनाच्या भीतीने अनोळखी व्यक्तीजवळ जाण्यास कोणीही धजावत नव्हते. शेवटी पोलिस पाटील नेहे यांनी वरील तरुणांसह जालिंदर येरमल, गणेश सावळे, भाऊसाहेब दुधवडे, विजय दुधवडे, किशोर पवार यांच्या मदतीने चादरीची झोळी करून त्याला रस्त्यापर्यंत आणले.

जखमीवर संगमनेर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पिटल, घोटी येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती वन विभाग व पोलिसांना देण्यात आली. पोलिस पाटील नेहे यांच्यासह ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे तरुणास जीवदान मिळाले. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com