कोपरगाव : तरुणाईला लागले शेअर बाजाराचे वेड

दोन वर्षांत गुंतवणूकदार वाढले, उत्पन्नाचा नवा स्रोत
Share Market
Share MarketSakal

कोपरगाव : केंद्र सरकारने आयात- निर्यातीबाबत घेतलेले धोरण, पायाभूत सुविधांना दिलेले प्राधान्य, आत्मनिर्भर भारतअंतर्गत उद्योजक व तरुणांसाठी घेतलेले निर्णय, अशा विविध कारणांमुळे भारतीय शेअर बाजार (सेन्सेक्स) (BSE SENSEX)वधारत चालला आहे. याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांना होत आहे. आतापर्यंत ठरावीक लोकांचीच मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात कोपरगावसारख्या ग्रामीण भागातील लोकही उतरलेत. विशेषतः तरुणाईचा यात मोठा भरणा आहे. दोन वर्षांपासून गुंतवणूकदारांची आकडेवारी झपाट्याने वाढते आहे.

Share Market
नाशिक : ऑनलाइन गंडविलेले ४० हजार परत

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने शेअर बाजारामधील(Stock market) ट्रेडिंग हे पैसा मिळविण्याचे नवीन साधन बनू शकते, अशी येथील तरुणाईची मानसिकता झाली. त्यातूनच कमी भांडवलात त्यांनी हा पर्याय निवडल्याचे जाणकारांचे मत आहे. जे तरुण अभ्यासपूर्ण पद्धतीने या क्षेत्राकडे वळाले, त्यांना चांगला नफा मिळत आहे. बाजाराचे ज्ञान न घेता त्यात उडी मारलेले अनेक जण मात्र तोंडावर आपटले आहेत.

Share Market
कोल्हापूर : पावणे चारशे 'पोलिसांना' मिळणार बढती

लॉकडाउनच्या काळात ज्यांनी बाजारामध्ये एंट्री केली, त्यांची गुंतवणूक दुप्पट-तिप्पट वाढली आहे. जे जास्त अवधीसाठी गुंतवणूक करतात, त्यांना हमखास नफा होतो. मात्र, अल्प ज्ञानावर जे फ्युचरचा पर्याय निवडतात, त्यांना तोटा होतो, असे ब्रोकर सांगतात. या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये कमी कालावधीत, कमी वेळेत जास्त नफा मिळत असल्याने नवगुंतवणूकदार तिकडे वळण्याची शक्यता अधिक असते.व्हॉट्‌सॲप, यू ट्यूब, टेलिग्रामच्या माध्यमातून ग्रुप बनवून काही सल्लागार टिप्स देताना दिसतात. त्यांच्या जाळ्यात कोपरगावचे तरुण ओढले गेलेत, हे मात्र नक्की. राष्ट्रीयीकृत बँका आणि पतसंस्थांचे व्याजदर कमी झाल्यानेही गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळाल्याचे दिसून येते. लॉँग टर्म, एसआयपी नेहमीच मोठा परतावा देते. प्रत्येकाने आपली जोखीम ओळखून गुंतवणूक केल्यास शेअर मार्केट हा चांगला पर्याय असल्याचे सल्लागार संकेत बगळे यांनी सांगितले.(share market investment)

Share Market
बियाणांची नासाडी टळणार ! 'श्री सिध्देश्‍वर'ची चिमुकली बनविणार "आधुनिक पेरणी मशीन'

योग्य व अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केली, तर नक्कीच पैशांची वृद्धी होते. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम वेगाने सुरू असल्याने, बाजारात गुंतवणुकीचा ओघ सुरूच राहील.

- सचिन मुंदडा, ब्रोकर, कोपरगाव

व्यवसाय सुरू असून, उत्पन्नाचे अजून एक वेगळे साधन मिळावे. बँकेच्या व्याजदरात घट झाल्याने तिथे गुंतवणूक करण्यापेक्षा बाजारात काही काळाने का होईना नफा मिळेल, या आशेने तिकडे वळलो आहे. रिकाम्या वेळेत शेअर बाजारात खरेदी- विक्रीला प्राधान्य देतो.

- महेश भोर, व्यावसायिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com