Statewide Leopard Fear: MLA Date Calls for Emergency Wildlife Control Steps in Assembly
Sakal
अहिल्यानगर
MLA Kashinath Date: राज्यातील बिबट्याची दहशत थांबवा: आमदार काशिनाथ दातेंनी अधिवेशनात उठवला आवाज; सरकारने उपाययोजना कराव्यात !
Maharashtra Leopard Attacks Rising : बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी राज्यभर भीतीचे सावट; आमदार दातेंची तातडीच्या उपाययोजनांची मागणी
पारनेर / टाकळी ढोकेश्वर : राज्यात मागील काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण, तसेच शहरी वस्त्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत तीन वर्षात बिबट्या आणि वाघांच्या हल्ल्यांत २५० हून अधिक नागरिक आणि सुमारे १७ हजार पाळीव प्राणी बळी पडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे, यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत केली.

