esakal | अखेर अनर्थ टळला अन् बालविवाह रोखला! प्रशासनाची सतर्कता
sakal

बोलून बातमी शोधा

child marriage

अखेर अनर्थ टळला अन् बालविवाह रोखला! प्रशासनाची सतर्कता

sakal_logo
By
दौलत झावरे

तळेगाव दिघे (जि.अहमदनगर) : कौठेकमळेश्वर येथे शनिवारी (ता.४) सकाळी होणारा १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेने रोखण्यात आला. मुलीच्या आई - वडिलांना बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्याची माहिती देत समज देण्यात आली. काय घडले नेमके?

प्रशासनाची सतर्कता; बालविवाह कायद्याची दिली समज
कौठेकमळेश्वर येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह सुकेवाडी ( ता. संगमनेर) येथील युवकाशी ठरविण्यात आला होता. मात्र याबाबत संगमनेर तालुका पोलिस ठाणे व ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती मिळाली होती. त्यानंतर मुलीच्या वडिलांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेऊन बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्याची माहिती देण्यात आली. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असा मुलीच्या आई - वडिलांचा तसेच मुलीचा लेखी जबाब लिहून घेण्यात आला. या प्रसंगी संगमनेर तालुका पंचायत समितीचे सदस्य अशोक सातपुते, उपसरपंच नवनाथ जोंधळे, ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक, रामदास भडांगे, वाल्मिक जोंधळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण औटी, पोलीस नाईक राजेंद्र पालवे, ओंकार शेंगाळ उपस्थित होते.

हेही वाचा: जायकवाडीचा फैसला परतीच्या पावसाच्या हाती! जाणकारांचा दावापोलिस व ग्रामपंचायत प्रशासनास माहिती मिळाल्यानुसार सतर्कता बाळगत बालविवाह रोखण्यात यश आहे. मुलीचा बालविवाह करणार नाही, अशी लेखी हमी आई - वडिलांकडून घेण्यात आली आहे. - सुरेश मंडलिक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत, कौठेकमळेश्वर

हेही वाचा: चिमुकल्याचा गळा घोटणाऱ्या पित्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी

loading image
go to top