
Fire caused by short circuit engulfs 45 acres of sugarcane in Brahmani; 16 farmers lose crops worth ₹85 lakh.
राहुरी : ब्राह्मणी येथे सोमवारी (ता. २०) महावितरणच्या झोळ आलेल्या विद्युत वाहिनीत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे १६ शेतकऱ्यांचा ४५ एकर ऊस जळून भस्मसात झाला. त्यात, शेतकऱ्यांचे सुमारे १० एकर उसातील ठिबक संचाचीही राखरांगोळी झाली. सुमारे २५०० मेट्रिक टन ऊस आणि ठिबक संच, असे अंदाजे ८५ लाखांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.