

Swabhimani Shetkari Sanghatana activists blocking sugarcane-laden trucks, demanding fair prices for farmers.
Sakal
शेवगाव: ऊस दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे घोटण (ता. शेवगाव) येथे ऊसतोड बंद आंदोलन छेडण्यात आले. काही साखर कारखान्यांनी बळजबरीने तोड सुरू ठेवल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, गंगामाई, युटेक, प्रवरा व बालअंबिका या कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवली. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.