पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना निरोप तर नितीनकुमार गोकावे यांचे सुपेत स्वागत

मार्तंड बुचुडे
Tuesday, 15 December 2020

वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी याचा विचार करता पोलिसांची संख्या कितीही वाढविली तरी ती अपुरीच पडणार आहे.

पारनेर (अहमदनगर) : वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी याचा विचार करता पोलिसांची संख्या कितीही वाढविली तरी ती अपुरीच पडणार आहे. त्यासाठी प्रत्येक माणूस हा पोलिस आहे, असे समजून जर प्रत्येकाने काम केले. तसेच आपल्या 10 मीटर परिसरात किमान गुन्हे घडणार नाहीत, याची काळजी घेतली तर पोलिसांवरील ताण कमी होईल व गुन्ह्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटेल, असे प्रतिपादन सुपे पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी केले.

हे ही वाचा : कोरोनाने वडिलांचे निधन झाल्यानंतरही केलेल्या कार्याची राज्यपालांकडून दखल

नुकतीच सुपे पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची नगर येथे व गोकावे यांची सुपे पोलिस ठाण्यात बदली झाल्याने भोसले यांचा निरोप व गोकावे यांचा स्वागत समारंभ सुपे व परिसरातील ग्रामस्थांनी आयोजित केला होता, त्यावेळी गोकावे बोलत होते. यावेळी सुप्याचे माजी सरपंच विजय पवार, वाघुंडेचे माजी सरपंच संदीप मगर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुनिल थोरात, सचिन पवार, सागर मैड, योगेश रोकडे, नंदू सोंडकर, काऩिफ पोपळघट, अमोल मैड, सिराज शेख, शहारूख शेख, राहुल नांगरे आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

हे ही वाचा : कान्हुर पठार पतसंस्थेचे यश उल्लेखनीय : काँग्रेसचे विनायक देशमुख
    
गोकावे पुढे म्हणाले, कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. कोणावरही अन्याय होणार नाही, याची मी दक्षता घेईल. मात्र कोणी एखाद्यावर अन्याय केला तर मात्र खपवून घेतले जाणार नाही. सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुक काळात प्रत्येक गावातील राजकिय नेते, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांचा व्हॉटसअप ग्रुप तयार करून त्यावर विविध सूचना देण्यात येतील. तसेच त्यावर चर्चाही करता येईल, असा नविन उपक्रम राबविणार असल्याचेही शेवटी गोकावे म्हणाले.

भोसले म्हणाले, मला येथील लोकांनी खूप सहकार्य केले. त्याबद्दल मी त्यांचा अभारी आहे. काही प्रकरणात मला त्रासही झाला. मात्र मी केलेल्या कामावर मी समाधानी आहे. मी पोलिस खाते व समाजाची बांधिलकी या दोनही घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. यावेळी सूत्रसंचालन व प्रास्ताविक हवलदार खंडू शिंदे यांनी केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supe Police Station Inspector Rajendra Bhosales Farewell Ceremony and Newly Appointed Police Inspector Nitin Kumar Gokaves Welcome Ceremony