

राशीन : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलकांची उपासमार होऊ नये, यासाठी बारडगाव सुद्रिक, भांबोरा, कानगुडवाडी येथील मराठा भगिनी व बांधवांनी भाकरी, चटणी, लोणचे, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे पुड्यांची शिदोरी पाठवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.