Supriya Sule - स्व. गोपीनाथ मुंडेंना भाजप विसरला तरी मी विसरणार नाही सुप्रिया सुळे पाथर्डीत परिसंवाद

फडणवीस यांना आधी फूलमंत्री केले मग हाफ मंत्री केले तर आता हाफच्या हाफ मंत्री केल्याने मला फडणवीस यांची कीव येते.
supriya sule
supriya sule sakal

पाथर्डी - जिवाचे रान करून १९९५ साली राज्यात युतीची सत्ता स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आणली. त्यांच्या मुलीलाच आज भाजपने अडगळीत टाकले आहे. ‘बेटी पढाव बेटी बचाव’ असे म्हणणारा भाजप आज पंकजा मुंडे यांना विसरला, असला तरीही मी विसरणार नाही. मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसाठी पुकारलेल्या संपात आम्ही निश्चित मदत करू, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

संस्कारभवन येथे आयोजित परिसंवाद प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रदेश युवाध्यक्ष मेहबूब शेख, राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे, संदीप वर्पे, चंद्रकांत म्हस्के, माधव काटे, योगिता राजळे, शिवशंकर राजळे, ऋषिकेश ढाकणे, कल्याण नेमाने, शारदा लगड, अभिषेक कळमकर, भगवान दराडे, उज्ज्वला शिरसाठ, बंडू पाटील बोरुडे, सीताराम बोरुडे, सविता भापकर, रत्नमाला उदमले आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी सुळे यांनी मोहटादेवीचे दर्शन घेतले.

सुळे म्हणाल्या, कारवाईचा धाक दाखवत सध्या पक्ष व आमदार फोडण्याचा उद्योग सुरु असला तरीही शिवसेना व राष्ट्रवादीची कोणी स्थापना केली, हे जनतेला माहीत आहे. कोणीही यावे व टपली मारून जावे, असे आता घडणार नाही. त्यांच्याकडे खोके असतील पण माझ्याकडे शरद पवार आहेत. जिवाचे रान करून मी राष्ट्रवादी जिवंत ठेवत दिल्लीसमोर झुकणार नाही. नांदेड व छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक लहान मुलांचे जीव गेले. मात्र एकनाथ शिंदे यांना त्याचे काही देणेघेणे नाही. अदृश्य शक्ती आज काम करत असून याच शक्तीने देवेंद्र

supriya sule
Ahmednagar : आरोग्य व्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा; बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

फडणवीस यांना आधी फूलमंत्री केले मग हाफ मंत्री केले तर आता हाफच्या हाफ मंत्री केल्याने मला फडणवीस यांची कीव येते. शाळा बंद करून दारूची दुकाने वाढवण्याचा यांचा उद्योग असून आम्ही सत्तेवर येताच या सरकारने घेतलेले सर्व निर्णय रद्द करू, असे त्या म्हणाल्या. प्रताप ढाकणे प्रास्ताविक केले. गणेश सरोदे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश रासने यांनी आभार मानले.

घुले यांची कार्यक्रमाकडे पाठ

​सुप्रिया सुळे या मतदारसंघात येऊनही माजी आमदार चंद्रशेखर घुले व त्यांच्या समर्थकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. घुले यांचे समर्थन हे अजित पवार यांना असल्याचे मानले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com