Ahmednagar : आरोग्य व्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा; बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपली भूमिका मांडताना थोरात म्हणाले,
balasaheb thorat
balasaheb thoratsakal

संगमनेर - नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवाचे कारण काय, यंत्रणेत इतका गलथानपणा का आला, औषध पुरवठ्याची स्थिती काय आहे? या प्रश्नांची खरी उत्तरे राज्यातील जनतेला हवी आहेत. बोजवारा उडालेल्या आरोग्य व्यवस्थेची श्वेतपत्रिका काढून या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपली भूमिका मांडताना थोरात म्हणाले, सलाईनवर असलेल्या राज्यातील आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी केवळ माझ्या एकट्याची नाही तर सर्व मंत्रीमंडळाची असल्याचे विधान आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपली भूमिका मांडताना थोरात म्हणाले, सलाईनवर असलेल्या राज्यातील आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी केवळ माझ्या एकट्याची नाही तर सर्व मंत्रीमंडळाची असल्याचे विधान आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

त्यामुळे सर्व मंत्रीमंडळाने ही जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. शासकीय रुग्णालयांनी कोविड काळात जीव तोडून काम करताना अनेक गंभीर रुग्णांना वाचवले, कारण तेव्हाच्या सरकारचा हेतू प्रामाणिक होता. संकटावर मात करण्याची आमची भूमिका होती. या वर्षात अक्षम्य दुर्लक्ष व शासनाच्या गलथानपणामुळे आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे. सामान्यांसाठी असलेल्या शासकीय रुग्णालयाच्या पाठिशी सरकारने खंबीरपणे उभे राहताना त्यांना आर्थिक पाठबळ देत त्यांच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

balasaheb thorat
Chh. Sambhaji Nagar : दौलताबाद घाटात वाहतूक ठप्प; प्रवाशांना मनस्ताप, वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा

नांदेडसह राज्यातील चित्र विदारक असून दोन दिवसात शेकडो रुग्णांना जीव गमवावा लागल्याने शासनाला त्यापासून पळ काढता येणार नाही. शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या माहितीवरून काढलेल्या निष्कर्षातील कारणे न पटण्यासारखी असल्यामुळे, उच्च न्यायालयाने स्वतः पुढाकार घेत दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत शासनावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. शासन व संबंधित अधिकाऱ्यांना या मृत्यूंची जबाबदारी दुसरीकडे ढकलता येणार नाही.

balasaheb thorat
Satara Politics : दादांची 'दादागिरी' साताऱ्यात चालेल का ? पालकमंत्री पदावरून जोरदार चर्चा ...

कायमस्वरुपी संचालकाची नियुक्ती नाही

वैद्यकीय शिक्षण व संशोधन या संस्थेशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये निगडीत असतात. मर्जीतील अधिकारी न मिळाल्याने या संस्थेवर अद्यापही कायमस्वरूपी संचालक नेमला नसल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com