esakal | निलंबित पोलिस निरीक्षकाचा कारनामा; माजी सदस्याच्या मुलाला डांबून खंडणीची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

nagar crime

निलंबित पोलिस निरीक्षकाने माजी सदस्याच्या मुलाला डांबले

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (जि.अहमदनगर) : एका निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षकाने एका महिलेच्या मुलांना त्यांच्या राहत्या घरात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले. तसेच पोलिस उपअधीक्षक मुलांची सुटका करण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची घटना आज सकाळी घडली. वाचा सविस्तर

निलंबित पोलिस निरीक्षकाचा कारनामा; माजी सदस्याच्या मुलाला डांबले

सुनिल लक्ष्मण लोखंडे हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. तो पहाटे पासून घरात प्रवेश करण्यासाठी दबा धरून बसला होता. त्याने आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान पिडीत महिलेच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी त्या बेडरूममधे होत्या. आरोपीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्या लहान मुलांना डांबून ठेवले. त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर रोखून धरत त्यांना बाहेर येण्यास सांगितले. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत मोबाईल वरून परिचितांना या घटनेची माहिती दिली.

हेही वाचा: NCBकडून 'त्या' दोघांविषयी उडवाउडवीची उत्तरं! काँग्रेसचा आक्षेप

दोन तास हे नाट्य सुरू

त्यामुळे थोड्याच वेळात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस उपअधिक्षक मिटके घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तास हे नाट्य सुरू होते. अखेर मिटके यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली. ती मिटके यांचा डोक्याजवळून गेली. मिटके थोडक्यात बचावले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शरीर संबंधाची मागणी करून, आठ लाख रुपयांची खंडणी

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण डिग्रस गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. दरम्यान, आरोपीने मागील आठवड्यात तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता पिडीत महिलेस राहुरी शहराजवळ अडवून, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले होते. त्यांना शरीर संबंधाची मागणी करून, आठ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी घटनेच्या रात्री त्यांनी आरोपीविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अपहरण, आर्म ॲक्ट, खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तोच गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने आजचे कृत्य केल्याचे समजते. दरम्यान, आज (गुरुवारी) दुपारी दोन वाजता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी डिग्रस येथे घटनास्थळी पाहणी केली.

हेही वाचा: Video: अन् विराट सिराजवर प्रचंड संतापला; पाहा काय घडलं

loading image
go to top