esakal | IPL 2021 Video: अन् विराट कोहली सिराजवर प्रचंड संतापला...
sakal

बोलून बातमी शोधा

Video: अन् विराट सिराजवर प्रचंड संतापला; पाहा काय घडलं

SRH vs RCB सामन्या दरम्यान घडला प्रकार

Video: अन् विराट सिराजवर प्रचंड संतापला; पाहा काय घडलं

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 RCB vs SRH Video: आधीच प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरलेल्या बंगळुरू संघाला बुधवारी तळाशी असलेल्या हैदराबाद संघाकडून हार पत्करावी लागली. खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असल्याने हैदराबादला फारशी फटकेबाजी करता आली नाही. २० षटकात SRH ने १४१ धावा केल्या. हे आव्हान पार करताना RCB ला ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या षटकात एबी डिव्हिलियर्स मैदानात असूनही भुवनेश्वर कुमारने हैदराबादला विजय मिळवून दिला. या सामन्यात RCB चा कर्णधार विराट कोहली वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर प्रचंड भडकला.

हेही वाचा: विराट म्हणतो, "आम्ही कोणाला घाबरत नाही, म्हणूनच..."

नक्की काय घडलं?

सामन्यात हैदराबाद संघाची फलंदाजी सुरू होती. दुसऱ्या षटकात जॉर्ज गार्टनने टाकलेला चेंडू अभिषेक शर्माने हवेत उंच मारला. चेंडू मोहम्मद सिराजच्या हाताला लागून बाजूला पडला. झेल घेण्यासाठी सिराजने जीवाचं रान केलं पण अखेर त्याच्या हातून झेल सुटलाच. सिराजने सामन्याच्या सुरूवातीलात झेल सोडल्याचं पाहून विराट कोहली त्याच्या वर चांगलाच संतापला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

पाहा Video:

विराटकडून युवा उमरानला खास गिफ्ट

SRHच्या ताफ्यात नेट बॉलर म्हणून जम्मू काश्मीरचा उमरान मलिक खेळत होता. टी नटराजनला कोरोनाची बाधा झाल्याने उमरानला संघात सामील करण्यात आले. उमरान मलिकने RCB विरूद्ध खेळताना तब्बल ताशी १५३ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला. IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय गोलंदाजाने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू होता. उमरानच्या वेगामुळे रन मशिन विराट कोहली प्रभावित झाला. सामना संपल्यावर विराटने त्याच्याशी संवाद तर साधला आणि त्याला स्वाक्षरी असलेली जर्सी भेट म्हणून दिली.

loading image
go to top