esakal | कुणी तलाठी देता का, तलाठी? राजापूरकरांची आर्त हाक; अनेकांची कामे खोळंबली
sakal

बोलून बातमी शोधा

talathi

कुणी तलाठी देता का, तलाठी? राजापूरकरांची आर्त हाक

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा


देवदैठण (जि. अहमदनगर) : श्रीगोंदे तालुक्यातील राजापूर येथे दोन महिन्यांपासून तलाठी येत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सीमेलगतच्या गावांत सहसा अधिकारी येण्यास टाळाटाळ करतात. पूर्वीचे तलाठी जयसिंग मापारी यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाली. त्यांच्या जागी रामदास बडे यांची नियुक्ती झाली. बडे दोन महिन्यांपासून गावात येत नसल्याने अनेकांची कामे रखडली आहेत. त्यामुळे कुणी तलाठी देता का, तलाठी, असे म्हणण्याची वेळ राजापूरकरांवर आली आहे.

अनेकांची कामे खोळंबली

अनेकांना सात-बारा, वारस नोंदी, तसेच अन्य दाखल्यांबाबत अनेक अडचणी येतात. सध्या ई-पीकपाहणी व नोंदणीची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना याबाबत माहिती नाही, तसेच सध्या पावसाळ्याचे आणि कोरोना संकटाचे दिवस असल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र तरीही शासकीय अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत.

हेही वाचा: Nitin Gadkari: "नगरहून जाणार सुरत-चेन्नई महामार्ग"

याबाबत सरपंच प्रतीक्षा मेंगवडे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन, तातडीने तलाठी न दिल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. धनंजय मेंगवडे, अनिकेत घावटे, पांडुरंग मेंगवडे, सुरेश मेंगवडे, सचिन धावडे, माधव कौठाळे, संदीप धावडे, वैभव कोरडे, बाळू धावडे, विनायक शेळके उपस्थित होते.

''संबंधित तलाठ्यास नोटीस काढली आहे. तालुक्यात नव्याने पदभार घेतल्याने थोडा वेळ द्यावा. कुठल्याही शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही.'' - मिलिंद कुलथे, तहसीलदार, श्रीगोंदे

हेही वाचा: अहमदनगर : संगमनेर खुर्द परिसरात ९ लाखांचा गांजा जप्त

loading image
go to top