
Marriage Fraud in Ahilyanagar: Woman Teacher Loses ₹22 Lakh to Cheater
अहिल्यानगर: लग्न करण्याचे आमिष दाखवत एका ४२ वर्षीय शिक्षिकेची तब्बल २२ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून प्रियकर अक्षय रामदास काळे, त्याची आई सविता काळे व बहीण सुप्रिया काळे (सर्व रा. काळेवाडी, ता. पारनेर) यांच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.