
-विनायक दरंदले
सोनई: अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खड्ड्यांची लांबलचक माळ तयार झाल्याने लहान, मोठे अपघात नित्याचेच झाले असताना अनेक गावांत रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. वाहतूक कोंडी होण्यास केंद्रबिंदू असलेल्या घोडेगाव (ता. नेवासे) येथे जनावरांचा बाजार व आठवड्यातील तीन दिवस होणारा कांद्याचा लिलावाकरिता होत असलेली वाहनांची बेशिस्त वाहतूक कोंडीस कारणीभूत आहे, तरी घोडेश्वरी विद्यालय ते शनिचौक मार्गावर असलेले खड्डे प्रमुख कारण आहे.