

Fear Grips Four Villages; Locals Demand Immediate Neutralization of Leopard
Sakal
नगर तालुका: नरभक्षक बिबट्या जीवघेणे हल्ले करत आहे. बिबट्याने कर्जुनेखारे येथील मुलीचा जीव घेतल्यानंतर निंबळकच्या मुलाला गंभीर जखमी केले. नरभक्षक बिबट्या लोक वस्तीत घुसू लागले आहेत. बिबट्यांना ठार मारण्याचे आदेश आल्याशिवाय रास्तारोको आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेत केडगाव-निंबळक बायपास रस्त्यावर आंदोलन केले. उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.