आमदार डॉ. तांबे यांची संगमनेरमध्ये कलावंतासाठी मिनी थिएटर उभारण्याची ग्वाही

आनंद गायकवाड
Friday, 20 November 2020

कवी अनंत फंदी नाट्यगृह अपूर्ण असल्याने नाट्य कलावंत व नाट्य रसिकांची मोठी अडचण होत आहे.

संगमनेर (अहमदनगर) : येथील कवी अनंत फंदी नाट्यगृह अपूर्ण असल्याने नाट्य कलावंत व नाट्य रसिकांची मोठी अडचण होत आहे.

त्यामुळे लवकरच नगरपालिकेच्या माध्यमातून किमान रंगमंच सुरू करून दिला जाईल. तसेच, संग्राम संस्थेतर्फे एक मिनी थिएटर बांधून ते कलावंतांना उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रंगमंचाबाबतच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी प्रा. शशिकांत माघाडे व "रंगकर्मी'चे अध्यक्ष अंतोन घोडके यांच्या पुढाकारातून आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, आर्किटेक्‍ट अरविंद वैद्य व संगमनेरमधील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नाट्यगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी, नाट्यगृहासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नाट्यगृह बंदिस्त करण्यासाठी तांत्रिक अडचणी असल्यामुळे नगरपरिषदेतर्फे किमान रंगमंचाची दुरुस्ती करून तो कलावंतांना उपलब्ध करून दिला जाईल,' असे सांगितले. 

आर्किटेक्‍ट अरविंद वैद्य यांनी नाट्यगृहाच्या तांत्रिक बाबींची कलावंतांशी चर्चा केली. कलावंतांनी आपल्या अडचणी सांगत काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या. उपनगराध्यक्ष सुमित्रा दिड्डी, शैलेश कलंत्री, अमित सोनवणे, ऍड. सुहास आहेर, ज्येष्ठ नाटककार डॉ. सोमनाथ मुटकुळे, सूर्यकांत शिंदे, निर्माते वसंत बंदावणे, वंदना बंदावणे, डॉ. संजय दळवी, साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, प्रा. सुरेश परदेशी, डॉ. अमित शिंदे, भरत रणखांबे आदी उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Testimony of setting up a mini theater for artists in Sangamner