राज्याच्या प्रमुख धरणांमध्ये सरासरी 29.85 टक्के उपयुक्त पाणीसाठा

राज्याच्या प्रमुख धरणांमध्ये सरासरी 29.85 टक्के उपयुक्त पाणीसाठा

संगमनेर (अहमदनगर) : राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील प्रमुख 50 धरणांमध्ये आजअखेर सुमारे 234.017 टीएमसी (सरासरी 29.85 टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिली आहे. (The major dams of the state have useful water reserves)

राज्याच्या प्रमुख धरणांमध्ये सरासरी 29.85 टक्के उपयुक्त पाणीसाठा
दिलासादायक! नगरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस होतीय घट

चकोर म्हणाले, ‘‘राज्याच्या सहा महसूल विभागांपैकी कोकण विभागातील तीन प्रमुख धरणांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा 54.703 टीएमसी असून, सध्या या धरणांमध्ये सुमारे 15.373 टीएमसी (28.63 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील प्रमुख आठ धरणांमधील एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा सुमारे 96.410 टीएमसी असून, त्यात आजअखेर सुमारे 27.108 टीएमसी (28.5 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

राज्याच्या प्रमुख धरणांमध्ये सरासरी 29.85 टक्के उपयुक्त पाणीसाठा
नगरमध्ये रेशनचा काळाबाजार; धान्यसाठ्यांवर छापे

मराठवाड्यातील प्रमुख सहा धरणांमधील एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा 159.80 टीएमसी असून, आजमितीस यात अंदाजे 62.165 टीएमसी (38.90 टक्के), नागपूर विभागातील प्रमुख पाच धरणांमधील एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा सुमारे 85.003 टीएमसी इतका असून, आजमितीस अंदाजे 30.17 टीएमसी (35.49 टक्के), अमरावती विभागामधील सात प्रमुख धरणांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा 47.755 टीएमसी आहे. आजअखेर अंदाजे 16.505 टीएमसी (34.56 टक्के), तर पुणे विभागातील प्रमुख 19 धरणांमधील एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा 344.745 टीएमसी इतका असून, आजमितीस अंदाजे 82.696 टीएमसी (23.98 टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

राज्याच्या प्रमुख धरणांमध्ये सरासरी 29.85 टक्के उपयुक्त पाणीसाठा
राज्यमंत्री तनपुरे यांच्यासह महापालिका आयुक्तांना खंडपीठाची नोटीस

याचबरोबर मुंबई शहर व उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाच प्रमुख धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा सुमारे 17.773 टीएमसी इतका असून, या धरणांमध्ये आजमितीस अंदाजे 4.217 टीएमसी (23.17 टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. ठाणे शहर व उपनगरे यांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारावे धरणात अंदाजे 4.092 टीएमसी इतका, म्हणजेच 34.20 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यातील तीन प्रमुख धरणांमध्ये उजनी (-) 8.96 टीएमसी, म्हणजे (-) 16.17 टक्के, कोयना धरण (+) 32.79 टीएमसी (32.75 टक्के) व मराठवाड्यासाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणात (+) 25.5913 टीएमसी (33.38 टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. (The major dams of the state have useful water reserves)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com