esakal | अहमदनगर : चोरट्यांनी एकाच रात्री फोडली आठ घरे; परिसरात भीती | Crime News
sakal

बोलून बातमी शोधा

thieves broke into eight places in one night in the bhandardara area

अहमदनगर : चोरट्यांनी एकाच रात्री फोडली आठ घरे; परिसरात भीती

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अकोले (जि. अहमदनगर) : तालुक्यातील शेंडी व भंडारदरा परिसरातील गावांत चोरट्यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास आठ ठिकाणी घरफोड्या केल्या. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

अकोले तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) व परिसरात चोरट्यांनी रविवारी पहाटे बंद घरांना लक्ष्य करीत आठ ठिकाणी चोरी केली. शेंडी येथील तुकाराम धांडे यांच्या बंद घराचा दरवाजा तोडत चोरांनी आत प्रवेश केला. सामानाची उचकापाचक केली. धांडे हे कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने चोरीचा तपशील समजला नाही. राजेश राठोड यांच्याही घराबाहेरील जाळीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, कुटुंबीय जागे झाल्याने चोरटे पळून गेले. शेंडीतील साबळे व भवारी यांच्या बंद घरांवरही चोरट्यांनी हात साफ केला. चिचोंडीतील युसूफ मणियार यांच्या घराशेजारील दुकान फोडून ९४ हजारांची रोख रक्कम चोरून नेली. मणियार हे राजूर येथे लग्नास गेले होते. वारंघुशी गावातही चोरट्यांनी दोन घरे फोडली. या दोन्ही घरांचे मालक मुंबईला राहत असल्याने, नक्की किती ऐवज चोरीला गेला, हे समजू शकले नाही.


पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अहमदनगर येथून ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचा: आघाडी सरकारला सामान्यांचे घेणे-देणे नाही : डॉ. सुजय विखे

हेही वाचा: सलग चौथ्या वर्षी ‘मुळा’ काठोकाठ

loading image
go to top