esakal | दुसऱ्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकविणारी महिलाच झाली 'शिकार'; नगरमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

women caught

शिकाऱ्याचीच झाली शिकार! महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अकोले (जि.अहमदनगर) : प्रेमाच्या जाळ्यात ओढून, अश्लील चित्रफितीच्या आधारे खंडणी उकळणाऱ्या महिलेसह तिघांना अकोले पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. या महिलेने अनेक पुरुषांना याच पद्धतीने जाळ्यात ओढल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. काही पुरुषांवर अत्याचाराचे गुन्हेही दाखल केले गेले आहेत. या प्रकरणात काही पीडित पुरुष पुढे येऊ लागले आहेत. दुसऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकविणारी ‘शिकारी’ महिलाच दोन साथीदारांसह कायद्याच्या जाळ्यात अडकून शिकार झाली आहे. (Three-arrested-for-ransom-marathi-news-jpd93)

अश्लील चित्रफीत काढून, त्याआधारे खंडणी उकळत होती

संगमनेर शहरातील एका उच्चभ्रू परिसरात संबंधित महिला एका बंगल्यात राहत होती. फेसबुक, व्हॉट्‍सॲपद्वारे ती प्रोफाइल (संबंधिताची व्यक्तिगत माहिती) तपासून पाहत होती. श्रीमंत व्यक्‍ती असल्यास त्याच्याशी फेसबुक आणि व्हॉट्‍सॲपच्या माध्यमातून संपर्क साधून प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. घरी बोलावून दोन साथीदारांच्या मदतीने अश्लील चित्रफीत काढून, त्याआधारे खंडणी उकळत होती. अकोले तालुक्‍यातील एका पुरुषाला ११ जून ते १३ जुलैदरम्यान याच पद्धतीने संबंधित महिलेने जाळ्यात अडकवून, अश्लील चित्रफितीच्या आधारे एटीएममधून ३० हजार रुपये काढून घेतले. आक्षेपार्ह चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल न करण्यासाठी दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी पीडित व्यक्तीने अकोले पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांची भेट घेऊन आपबीती सांगितली.

६ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

संबंधित महिलेला खंडणीच्या उर्वरित रकमेपैकी दहा हजार रुपये अकोले तालुक्‍यातील सुगाव फाटा येथे बुधवारी (ता. १४) देण्याचे ठरविले. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष सुगाव फाटा येथे सापळा लावला. खंडणीची रक्कम संबंधित महिलेने दोन साथीदारांसह स्वीकारली. रक्कम स्वीकारताच तिला व तिचे दोन्ही साथीदार आरोपी रावसाहेब पंढरीनाथ सटाले आणि सुभाष शिंदे (दोघे रा. संगमनेर) यांना अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या इर्टिगा या चारचाकी वाहनासह ६ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला आहे. महिला आणि तिच्या साथीदारांना न्यायालयासमोर हजर केले असता, सोमवारपर्यंत (ता. १९) आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा: नगर जिल्ह्यात १३३ गावांमध्ये दीड वर्षांनी वाजली शाळेची घंटा

संगमनेर तालुक्‍यातही एक गुन्हा

संबंधित महिलेविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात खंडणीचा एक गुन्हा दाखल आहे. या महिलेनेही काही व्यक्‍तींवर अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. या महिलेने फसविल्याची आणखी काही प्रकरणे पुढे येण्याची शक्‍यता आहे.

पोलिसांशी संपर्क साधा

नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे यावे. शरीरसुखाचे आमिष दाखवून अश्लील चित्रफीत तयार करीत धमकी देत कोणी पैशांची मागणी करीत असेल, तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा: लग्नाआधीच भंगली सुखस्वप्ने; भावी नवरीने संपविली जीवनयात्रा

loading image