आरोग्य केंद्राला ‘विठ्ठल’ पावला; तीन कोटी निधी मंजुर, लंघे यांची माहिती

सुनील गर्जे
Tuesday, 13 October 2020

कुकाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीसाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत कुकाणे येथे उभारण्यात येणार  आहे.

कुकाणे (अहमदनगर) : कुकाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीसाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत कुकाणे येथे उभारण्यात येणार  आहे. या कामाचा शुभारंभ महिनाभरात होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कुकाणे (ता. नेवासे) येथे केंद्र रूग्ण कल्याण समितीची कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय आढावा बैठक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात पारपडली त्याप्रसंगी लंघे बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य डॉ. तेजश्री लंघे अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषदे सदस्य दत्तात्रेय काळे, माजी सरपंच दौलत देशमुख, सरपंच छाया गोर्डे,  रूग्ण कल्याण समिती सदस्य अपूर्वा गर्जे, डॉ. शुभांगी देशमुख, सुनिता गरड, शंकर भारस्कर, कारभारी गोर्डे यावेळी उपस्थित होते.

विठ्ठल लंघे म्हणाले, 'कुकाणे परिसर सतत गजबजलेला व मध्यवर्ती भाग आहे. येथील आरोग्य केंद्राची जुनी इमारतीची दयनीयअवस्था झाल्याने अत्याधुनिक नव्या बांधकामाची अनेक वर्षांपासनची मागणी होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले व माजी अध्यक्ष शालीनी विखे यांचेकडे मी नवीन इमारत बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. नेवासे तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनीही यासाठी सहकार्य केल्याने मोठा निधी मिळवता आला.

प्रस्ताविक डॉ. रामेश्वर शिंदे यांनी केले. यावेळी कुकाणे केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर शिंदे व डॉ. भाग्यश्री सारूक- किर्तने यांचा उत्कृष्ट कामाबददल डॉ. लंघे व काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आरोग्य सेवक अशोक गर्जे यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three crore sanctioned for primary health center at Kokane