अगस्ति साखर कारखान्याकडून कागदपत्रांची माहिती देण्यात आली : भास्कर घूले

शांताराम काळे 
Tuesday, 8 December 2020

अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडून तीन सभासदांनी अगस्तितील आर्थिक गोष्टीच्या संबंधित कागदपत्रांची मागणी केली.

अकोले (अहमदनगर) : अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडून तीन सभासदांनी अगस्तितील आर्थिक गोष्टीच्या संबंधित कागदपत्रांची मागणी केली. तसेच कारखाना प्रशासनाकडून संबंधित माहिती सोमवारी देण्यात आली असल्याबद्दल कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी कळविले आहे. 

हे ही वाचा : बिबट्याच्या चर्चेने राशीन परिसर भेदरला; करमाळा तालुक्यात तिघांचा मृत्यू : कर्जतच्या सीमेवर बिबट्याच्या वावर

अगस्ति कारखान्यातील सभासद बाळासाहेब देशमुख, दशरथ सावंत, मारुती भांगरे यांनी ही मागणी 26 नोव्हेंबर रोजी पत्र देऊन मागणी केली होती. ही माहिती देण्याची कोणत्याच पद्धतीची टाळाटाळ अगस्तित प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार सर्व माहिती उपलब्ध असून ती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्याबाबत दोन चार दिवस उशीर झाला असेल पण ती देण्याबाबत अगस्तिकडून नकार देण्यात येत असल्याबद्दल चुकीची माहिती व अफवा पसरविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन भास्कर घुले यांनी केले आहे.

हे ही वाचा : अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

संचालक मंडळातील काही संचालक हे कोरोना पॅाझिटीव्ह झाल्यानंतर संचालक मंडळाची बैठक झाली नाही. संबंधित माहिती देण्यात संचालक मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ती दिली जाते. त्यामुळेच ही माहिती सभासद मारूती भांगरे यांनी कारखान्याकडून तातडीने घेऊन जाण्याबाबत मी स्वतःच कळविले असल्याचेही घुले यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कार्य.संचालक श्री. घुले यांनी केले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three members from Agastya Co operative Sugar Factory demanded documents related to Agastyas financial affairs