
-मार्तंड बुचुडे
पारनेर : खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून आणि आपला मावळा व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या पुढाकारातून गड संवर्धन, स्वच्छता व वृक्षारोपण पाचव्या मोहिम तिकोना गडावर पार पडली या वेळी हजारो शिवभक्तांनी आपला सहभाग नोंदविला. उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये विक्रमी उत्साह जाणवत होता. या वेळी तिकोना गडावर शिवभक्तांचा लोटला जनसागर हाेता.